पिंपरी-चिंचवड । गणेशोत्सव काळात कोकणला जाणार्या चाकरमान्यांसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील एसटी महामंडळाच्या आगारातून जादा बस सोडण्यात याव्यात, अशी मागणी मानव अधिकार फोरमने केली आहे. याबाबत राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना पत्र पाठविले आहे. 25 ऑगस्टला गणरायाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवासाठी 23 ते 31 ऑगस्ट दरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून कोकणात जाणार्या नागरिकांची संख्या अधिक असणार आहे. नागरिकांची अडचण होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने जादा बस सोडाव्यात. पुणे स्टेशन, शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी-चिंचवड या ठिकाणाहून कोकणातील रत्नागिरी, चिपळून, गुहागर, मालवण, दोडामार्ग, सावंतवाडी, दापोली, देवगड, खेड आणि आंबोली या ठिकाणी जादा बस सोडण्यात याव्यात, अशी मागणी मानव अधिकार फोरमचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवराम गवस यांनी केली आहे.