जादा विजबिलामुळे संतप्त ग्राहकांचा अधिकार्‍यांना घेराव

0

वरणगाव। महाराष्ट्र राज्य विद्युत महामडंळ कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहकांना जादा वीज बिले आकारणी केली जात असल्याने संतप्त ग्राहकांनी शहरातील वीज वितरण कार्यालयात जावून अधिकार्‍यांना लेखी निवेदन देऊन आपली तक्रार मांडली.

शहरातील काही ग्राहकांना विज वापरापेक्षा अधिक युनिटचे बिल देण्यात आले. यात विज महामंडळाचा गलथान कारभार दिसून येतो. त्यामुळे विज बील कमी करण्याची मागणी ग्राहकांनी केली. यावेळी संतोष माळी, अमीर खान ताज खान, अयुब खान, मयुस खा शेरव, जबर खान, रशिद खान, असलाख रवान, उमरात रवान, विजय माळी, मोहम्मद खान, सुभाष माळी, नविशानबी, सुनीता माळी आदी उपस्थित होते.