जाधववाडीत आज ‘चला हवा येवू द्या‘ची धमाल

0
पिंपरी :भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमीत्त जाधववाडीत मनोरंजनाचे सुसाट वादळ ‘चला हवा येवू द्या‘ हा मनोरंजानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महापौर राहुलदादा जाधव स्पोर्ट्स फाऊंडेशनच्यावतीने शनिवार 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता रामायण मैदान, जाधववाडी येथे कार्यक्रम होणार असल्याची माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली. कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे यांच्यासह शहरातील प्रमुख राजकीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या मनोरंजनात्मक कार्यक्रम हास्य मैफिलीतून मराठी मनांवर राज्य करणारी ‘चला हवा येवू द्या‘ ची टीम पिंपरी चिंचवडकरांच्या भेटीस येणार असून कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील. कार्यक्रमात 15 हजार नागरिकांची बैठक व्यवस्था असून महिला आणि पुरुष असे दोन कक्ष तयार राहणार आहेत. त्याचप्रमाणे वीस एकर जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्याचेही महापौर जाधव यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहनही महापौरांनी केले आहे.