इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना त्वरित फाशी दिली जाणार नाही, असे विधान पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केले आहे.
25 डिसेंबरला जाधव यांच्या आई आणि पत्नी त्यांना भेटण्यासाठी पाकिस्तानला जाणार आहेत. ही त्यांची कदाचित शेवटची भेट असेल असे वृत्त पसरले आहे. तथापि, ते खोटे असून, जाधव यांच्या शिक्षेची अंमलबजावणी त्वरित करण्याची पाकिस्तानची योजना नाही. शिक्षेच्या अंमलबजावणीचा दिवस अद्याप ठरलेला नाही, असे प्रवक्त्याने सांगितले.