अमळनेर – तालुक्यातील जानवे येथे सकाळी रुढीप्रमाणे गावात भाकरी गोळा करत असताना फिर्यादीच्या सून असलेल्या महिलेवर व पतीवर तलवार हल्ला करून आरोपीने गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून आरोपीस अमळनेर पोलिसांनी अटक केली, आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, याबाबत फिर्यादी इंदुबाई हिलाल मांग ( निकुंभ ) यांची सून असलेली महिला तालुक्यातील जानवे गावात भाकरी गोळा करत असताना आरोपी अजय मंगल पारधी, माझ्याबरोबर पळून चलते का असा प्रश्न करून तिच्या मागावर फिरत होता. याबाबत पीडित महिलेने घरी जाऊन ही बाब फिर्यादी सासू इंदुबाई हिलाल मांग निकुंभ व सासरे यांना सांगितली . याबाबत आरोपीकडे जाब विचारायला गेली असता आरोपी अजय मंगल पारधी व मुन्नाबाई मंगल पारधी या दोघांनी मिळून फिर्यादीच्या मांडीवर व हातावर धारदार तलवारीचे वार करून गंभीर जखमी केले आहे तर फिर्यादीच्या पतीचे देखील हाताची बोट छाटले. याबाबत झालेल्या घटनेनंतर पोलिसांनी जानवे येथे जाऊन आरोपीस ताब्यात घेतले असून इंदुबाई मांग यांच्या फिर्यादी वरुन अमळनेर पोलिसात भादवी कलम 332, 326, 506, 504,34 प्रमाणे आर्म कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. या घटनेच्या पुढील तपास सुभाष महाजन हे करीत आहेत.