जानेवारीच्या हंगामात बेलगंगेचा धुर निघणार

0

चाळीसगाव : जिल्हा बँकेला अंबाजी ट्रेडींगच्या माध्यमातून भरलेल्या 40 कोटी रुपयांच्या रक्मेतुन न्यायालयाच्या आदेशाने 11 कोटी रुपये कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीत वर्ग केले असुन उर्वरित रक्कम अंबाजी ट्रेडींग कंपनी भरणार असुन कर्मचार्‍याशी देणी देण्या बाबत येत्या रविवारी येथील दत्तवाडीतील के. डी. ओ. हॉलमध्ये संवाद मेळाव्याच्या आयोजन केले असून जानेवारीच्या हंगामात बेलगंगेचा धुर निघणार असल्याचा आशावाद अंबाजी ट्रेडींग कंपनी विस्वस्त माजी चेअरमन चित्रसेन पाटील यांनी 7 रोजी त्यांच्या दुध सागर मार्ग रोडवरील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परीषदेत व्यक्त केला.

बेलगंगा सहकारी साखर कारखाना खरेदीची 40 कोटी रुपयांची रक्कम आम्ही अंबाजी ट्रेडींग कंपनीच्या माध्यमातुन भरल्या नंतर आमची जबाबदारी निश्‍चीत झाली. कामगाराची देणी देण्या बाबत आम्ही बांधील आहोत कामगाराच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांना म्ळिणे जवळपास निश्‍चीत झाले आहे. त्यांचा राहीलेला थकीत वेतनाचा व ईतर देणी संदर्भातला विषय मार्गी लावण्यासाठी येत्या रविवारी शहरातील दत्तवाडी स्थित के. डी. ओ. हॉल मध्ये सकाळी 11 वाजता आम्ही स्वतः एक पाऊल पुढे टाकून कर्मचार्‍यांशी संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. न्यायालयाने ओदश दिल्यानंतर जिल्हा बँकेने कामागाराच्या भविष्य निर्वाह निधीत 1 नोव्हेंबर 2017 रोजी 11 कोेटी रुपये वर्ग केल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. कर्मचारी हे गटागटाने येऊन आम्हाला भेटतात खरे पाहता त्यांनी एकत्र यायला हवे आम्हाला त्यांना न्याय द्यायचा आहे. न्यायालयात यचिका असल्यामुळे जिल्हा बँकेने अटी टाकल्या होत्या त्या सर्व अटी देण्या संदर्भातील मान्य होत्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम अद्याप निश्‍चीत झाली नाही ती न्यायालयात प्रलंबित आहे.

कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनाची मागणी कर्मचार्‍याशी संवाद प्रक्रिया झाल्यानंतर त्यांचा प्रश्‍न सोडविण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. कारखाना हस्तातराची प्रक्रिया नोव्हेंबर अखेरपर्यंत पुर्ण होणार असुन कारखाना सुरु झाल्यानंतर 500 ते 600 कर्मचार्‍यांना रोजगार मिळुन तालुक्याची अर्थ व्यवसथा बळकट होणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितले तर 10 हेक्टर ऊसाच्या लागवडी मध्ये दोन कारखान्याला पुरेल एवढा ऊस असुन कारखाना सुरु झाल्यानंतर शेतकर्‍यांना मोठा फायदा होईल, असे किरण देशमुख यांना सांगितले.