सांगवी : महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य संयोजक आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावतीने मोफत ‘अटल महाआरोग्य शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. शिबीर सांगवी येथील पी. ड्ब्लु. डी मैदानावर 11, 12 व 13 जानेवारी 2019 रोजी होणार आहे.
हे देखील वाचा
अटल महाआरोग्य शिबीरामध्ये विशेषतः गंभीर आजारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामध्ये हृदयरोग, शस्त्रक्रिया व प्रत्यारोपण, किडनी विकार व प्रत्यारोपण, लिवर प्रत्यारोपण, कॅन्सर व शस्त्रक्रिया आदी आजारांवर गोरगरीब रुग्णांसाठी शस्त्रक्रिया पूर्णत: मोफत करण्यात येणार आहेत. आजाराशी संबधित रुग्णांनी त्यांची आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी आमदार लक्ष्मण जगताप यांचे पिंपळे गुरव येथील कार्यालयात करावी. अधिक माहितीकरीता सतीश कांबळे यांच्याशी 8208487723 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.