जान्हवी कोणाला मानते रोल मॉडेल ?

0

मुंबई: श्री देवीची लाडकी कन्या जान्हवी कपूरने ‘धडक’ चित्रपटातून बॉलीवूड मध्ये एन्ट्री केली. पहिल्याच चित्रपटानंतर तिची ३ मोठ्या चित्रपटांसाठी वर्णी लागली आहे. जान्हवीनंतर अनेक स्टारकिड्स आता चित्रपटात दिसणार आहेत.

पदार्पणाच्या सुरुवातीलाच जान्हवीने यशाचे शिखर गाठण्यास सुरुवात केली असताना तिच्या यशामागील रोल मॉडेल कोण आहे, असे तिला विचारण्यात आले. त्यावेळी तिने करिना कपूर तिची रोल मॉडेल असल्याचे सांगितले. ‘करिना कपूर ज्याप्रकारे आत्मविश्वासाने चित्रपटसृष्टीत वावरते, तसेच मलाही काम करायचे आहे’, असे तिने सांगितले.

जान्हवी ‘तख्त’ चित्रपटानंतर गुजन सक्सेना या महिला वैमानिकाच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्येही लीड रोल साकारणार आहे.