चाळीसगाव । तालुक्यातील जामडी येथे एक खिल्लारी जातीचा बैल हा देवापुढे मालकाने ईशारा करताच नतमस्तक होत असल्याने हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. या बैलाला बघण्यासाठी गर्दी होत आहे. प्रगतीशिल शेतकरी तथा रयत सेनेचे शेतकरी जिल्हाध्यक्ष दिपक ईश्वरसिंग राजपूत यांनी मागील वर्षी खिल्लारी जातीचे दोन बैल चाळीस हजार रूपयात व्यापार्यांकडून विकत घेतले होते. बैलजोडी घरी घेऊन गेल्यानंतर त्यातील एक बैल त्याच्या खांद्यावर हात ठेवल्यास नतमस्तक होत असल्याचे त्यांना समजताच अगोदर ही त्याची सवय असल्याचे वाटले. वारंवार इशारा करून खांद्यावर हात ठेवून बोलले असता तो आपोआप नतमस्तक होत असे. पोळ्याला देवाच्या मंदिरासमोर उभा करून खांद्यावर हात ठेवून इशारा करताच सोन्या नामक हा बैल पुढील दोन पायावर नतमस्तक झाल्याने त्यास बघण्यासाठी परिसरातील नागरिक, शेतकरी गर्दी करत आहेत.
‘एक गाव एक पोळा’
चाळीसगाव तालुक्यातील आदर्श व खासदार यांनी दत्तक घेतलेल्या भोसर या गावात ’एक गाव एक पोळा’ या संकल्पनेतुन मिरवणुक काढण्यात आली. गाव दरवाज्याजवळ गावातील सर्व शेतकरी आपआपली बैल जोडी घेऊन जमा झाले. किशोर पाटील, सुनिल पाटील, रौफ सय्यद, अनिल पाटील, आबा पाटील, रंगराव पाटील, प्रकाश पाटील, योगेश पाटील, अरुण पाटील, दिपक पाटील, उत्तम पाटील, राहूल अगोणे, प्रमोद पाटील, अशोक पाटील, ज्ञानेश्वरे वेळे आदींनी मिरवणुकीत सहभाग घेतला.