जामदार रोडसाठी रहिवाशांचे उपोषण

0

बारामती । जामदार रोडची दूरवस्था झाली आहे. वारंवार निविदा काढूनही रस्त्याचे काम रखडले आहे. यामुळे संतप्त झालेल्या जामदार रहिवाशांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. बारामती नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोरच त्यांनी उपोषण सुुरू केले आहे. गुरुवारी उपोषणाचा 27 वा दिवस होता. रस्त्याचे काम जोपर्यंत प्रत्यक्षात सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.

बारामती तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरत आहे. या रस्त्याच्या कामासाठी नगरपालिकेने तीनवेळा निविदा काढली होती. परंतु कामाचा शुभारंभ मात्र अद्याप झालेला नाही. दरवेळी वेगवेगळी कारणे देऊन नगरपालिकेने काम करणे टाळले आहे. हा अनुभव लक्षात घेऊन यावेळी ही चूक होऊ द्यायची नाही, अशी भूमिका प्रशांत सातव व इतर उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. नगरपालिकेचे ठेकेदार हे प्रत्यक्ष काम सुरू करतील तेव्हाच खरे काय ते म्हणायचे. त्यामुळे आणखी काही दिवस उपोषण करावे लागले तरी चालेल, हा प्रश्‍न सोडवणारच. आम्ही यातून माघार घेणार नाही, असे शहाजी कदम व अजित साळुंखे यांनी सांगितले.