चाळीसगाव : भरधाव कंटेनरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत सासरा जागीच ठार झाला असून जावई गंभीर जखमी झाला. हा अपघात चाळीसगाव तालुक्यातील जामदा फाट्याजवळ घडला. याबाबत मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी अपघात एक ठार
अनिल गोरख चव्हाण (26, सेवानगर तांडा, ता.चाळीसगाव) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून सोमवार, 19 जून रोजी अनिल चव्हाण हा त्याचे सासरे सुभाष नथ्थू राठोड यांच्यासोबत धुळे जिल्ह्यातील मोरदड तांडा येथे कामानिमित्त दुचाकी (एम.एच.18 बी.टी. 9052) ने गेला असता परतीच्या प्रवासात जावई व सासरे पुन्हा सेवानगर तांडा येथे येण्यासाठी दुचाकीने येत असतांना रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील जामदा फाट्याजवळ भरधाव कंटेनर (एन.एल. 01, ए.ई.8463) ने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील सुभाष राठोड हे जागीच ठार झाले तर अनिल चव्हाण गंभीर जखमी झाले. याबबात मेहणुबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार जालमसिंग पाटील करीत आहे.