जामनेरचा रुपेश बिर्‍हाडे निबंध स्पर्धेत राज्यात प्रथम

0

जामनेर: कृषी व्यवस्थेवर, शेती, शेतकरी आणि शेती पद्धतीवर कोणकोणते परिणाम होत आहेत यावर विचार मंथन घडवून आणण्याच्या हेतूने मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत जामनेर येथील रुपेश राजाराम बिर्‍हाडे याने प्रथम क्रमांक पटकाविला. ‘टाळेबंदीचे कृषी व्यवस्थेवरील आर्थिक परिणाम’ हा निबंध स्पर्धेचा विषय होता. याबद्दल प्राचार्य डॉ.शिरीष पाटील, प्राचार्य डॉ. आय.डी.पाटील, संजय पवार (प्रकल्प विशेषज्ञ ना.दे.कृ.सं प्रकल्प, जळगाव), अभिमन्यू चोपडे (तालुका कृषि अधिकारी, जामनेर) प्रा.मिलींद लोखंडे, प्रा.डॉ.अंशुमन मिश्रा यांच्यासह आदींनी त्याचे कौतुक केले आहे.