जामनेरमधून संजय गरुड यांचा उमेदवारी अर्ज दाखल !

0

जळगाव: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज करण्याकरिता आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. दरम्यान जामनेरमधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड यांनी उमेदवारी अर्ज आज शेवटच्या दिवशी दाखल केला. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर संजय गरुड यांचे आव्हान असणार आहे. कार्यकर्त्यांसह जोरदार शक्तीप्रदर्शन करत गरुड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. गिरीश महाजन यांच्यामुळे जामनेर मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार डॉ.सतीश पाटील, गफ्फार मलिक, धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक मदन जाधव, प्रदीप लोढा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.