जळगाव: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज करण्याकरिता आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. दरम्यान जामनेरमधून चार ते पाच उमेदवार अर्ज दाखल झाले आहे. वंचित बहुजन आघाडीकडून सुमित नामदेव चव्हाण यांनी उमेदवार अर्ज दाखल केला आहे. जामनेर विधानसभा मतदार संघात राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे सलग पाच वेळा निवडून आले आहे. सहाव्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात आहे. राज्याच्या राजकारणात गिरीश महाजन सक्रीय असल्याने जामनेर विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.