जामनेर: काही दिवसांपासून कोरोनासारख्या महामारीमुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे जामनेरात सर्वत्र शुकशुकाट आहे . या भयावह वातावरणात सुध्दा एक आजीबाई रात्रंदिवस एकटी न्यु इंग्लिश स्कूल जवळील रोडच्या बाजुला ऐवढ्या ऊन्हात रस्त्यावर आपला संसार थाटुन तेथेच राहत आहे. कुठुन आली विचारले तर काय काहीच सांगत नाही. पण लॉकडाऊनमुळे दोन दिवसांपासून उपाशी आहे, काही खायला मिळेल का हेच फक्त या आजीबाईने सागितले. जामनेर शहरातील संवेदनशील मनाचे अविनाश बोरसे आणि मित्र यांनी जेवु घातले. हा उपक्रम जितके दिवस लॉकडाऊन आहे तोपर्यंत आम्ही सुरूच ठेवणार।
अन्नदाते,स्थनिक समाजसेवक व प्रशासनाने या आजीची व अशा मनोरुग्ण गोरगरीबाची परीस्थितीची माहिती काढून त्यांना सहकार्य करावे, दात्यांनी अन्नदानाच्या स्वरूपात मदतीसाठी पुढे यावे, ही विनंती या युवकांनी केली आहे. सर्व युवकांना आपल्या या संवेदनशील उपक्रमाने दिशा देणाऱ्या अविनाश बोरसे यासह विशाल लामखेडे, सौरभ पाटील, देवा पोळ यांचा सहभाग होता.