जामनेरातील त्रिनेत्र संस्थाचालकाकडून नागरिकांना रुमाल वाटप

0

जामनेर । शहरातील त्रिनेत्र संस्था चालकांकडून कोरोना या गंभीर आजारा पासुन बचावासाठी तोंडाला बांधण्यासाठी रुमाल वाटप मोहीम हाती घेण्यात आली.

शहरातील मुख्य मार्गावरून हिंडणारे तसेच कॉलनी परिसरातील लहान मुले,जेष्ठ नागरिक यांना तोंडाला बांधण्यासाठी हात रुमाल वाटप करण्यात आले. स्वताः सह इतरांचीही काळजी घ्या . प्रत्येकाने अंतर ठेऊन बसा. कोरोनाला पळवून लावा अश्या स्वरूपाचे आवाहन केले आहे. ज्यांच्या तोंडाला रुमाल दिसुन आले नाही त्यांना रुमाल बांधुन कोरोना या आजाराचे महत्व पटून देण्यात आले .
या मोहिमेत शिवसेना शहर प्रमूख पवन माळी, संस्था अध्यक्ष विनोद लोढा यांच्यासह इतर सदस्यांचा समावेश होता. नागरिकांची आरोग्याची काळजी म्हणून रुमाल वाटप मोहीम हाती घेतल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.