जामनेरात आज रक्तदान शिबिराचे आयोजन

0

जळगाव: येथील वाकी रोड भागातील सम्राट अशोक नगर येथील रहिवासी तथा लघु पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त चालक स्व.प्रभाकर दोधु भालेराव यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त बुधवारी, 24 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता सम्राट अशोक नगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराचे उद्घाटन माजी जलसंपदामंत्री तथा आ.गिरीष महाजन, नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी श्री गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे प.पू. श्याम चैतन्यजी महाराज असतील.

यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून दै.जनशक्तीचे संपादक यतीन ढाके, निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी, तहसीलदार अरुण शेवाळे, मुख्याधिकारी राहुल पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, उपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील, विनोद लोढा, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री पाटील, नगरसेवक डॉ.प्रशांत भोेंडे, माजी उपनगराध्यक्ष डॉ.संजीव पाटील, सरकारी वकील अ‍ॅड.अनिल सारस्वत, समाजसेवक गजानन क्षीरसागर, पत्रकार विनोद पवार, मोहन सारस्वत, मिलिंद लोखंडे, प्रकाश सैतवाल, सुहास चौधरी यांच्यासह सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहतील. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रुग्णांना रक्त पुरवठा मिळावा या उद्देशाने रक्तदान शिबीर प्रशासनाचे नियम पाळून घेण्यात येत आहे. शिबिराला रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे, असे आवाहन समस्त भालेराव परिवारातर्फे करण्यात आले आहे.