जामनेर । शहरातील शास्त्रीनगर भागातील प्रितेश सुशील वानखेडे (वय-सुमारे दीड वर्षीय) या बालकाचा पाण्याच्या हौदात बुडून मृत्यू झाल्याची घटना सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास खेळता-खेळता प्रितेश वरच्या मजल्यावर पोहचला, तोपर्यंत घरातील कोणाचेही त्या निरागस बालकाकडे लक्ष गेले नाही.
वरच्या मजल्यावर असलेल्या पाण्याच्या हौदात त्याचा तोल जाऊन पाण्यात गुदमरुन अखेर मृत्यू झाला. काही वेळाने शोधा, शोध केली असता बालकाचा मृतदेह हाती लागला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.