जामनेरात रोडरोमिओंना बदडले

0

जामनेर । महाविद्यालयात फिरणार्‍या रोडरोमिओंना पोलिसांनी पकडून चांगलाच चोप दिला. शाळाबाह्य तरुणांचा वावर वाढल्याने पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. आठवडाभरात ही दुसरी कारवाई असून विद्यार्थ्यांसोबत त्यांचे मित्र महाविद्यालयात येत असल्याचे या कारवाईच्या माध्यमातून दिसले.

जामनेर शहरात तालुकाभरातून शिक्षणासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांसोबत मित्र असलेल्या शाळाबाह्य तरुणांनीही थेट वर्गात प्रवेश करण्यापर्यत मजल मारल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार लक्षात येताच काही विद्यार्थ्यांनी तक्रार केल्याने महाविद्यालयात पोहचून पोलिसांनी दोघा विद्यार्थ्यांसह त्यांच्या शाळाबाह्य तरूण मित्रांनाही पोलिस ठाण्यात आणले. दोघांची चौकशी करून ते विद्यार्थी असल्याची खात्री होताच त्यांना सोडून दिले. तर प्रवेश नसतांना केवळ मुलींचा पाठलाग करण्याच्या उद्देशाने वर्गात बसलेल्या वाकी येथील सागर विजय निकम दिपक उखा सोनवणे यांना चोप देऊन पोलिस डायरीत नोंद घेऊन सोडून दिले. मोहीहम तीव्र करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.