जामनेरात शेतकर्‍यांना क्रेडीटकार्ड वाटप

0

जामनेर । जिल्हा बँकेतर्फे पाच शेतकर्‍यांना प्रातिनिधीक स्वरुपात जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याहस्ते त्यांच्या निवासस्थानी किसान क्रेडिट कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे विकास अधिकारी सुरेश पाटील, निवृत्त अभियंता जे.के. चव्हाण, नगरसेवक छगन झाल्टे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.यात एकनाथ सखाराम माळी, चंद्रकांत जावळे, अरुण देशमुख, विजय सोनवणे, गोविंदा धनगर यांचा समावेश होता. राज्यातील कर्जमाफीचा निर्णय सरकार योग्य वेळेवर घेणारच आहे. मात्र, कर्जमुक्तीपेक्षा शेतकरी समृद्ध होणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे ना. महाजन यांनी सांगितले.