जामनेर उपजिल्हा रुग्णालयात ३ महिन्यांपासून औषध तुटवडा

0

जामनेर । उपजिल्हा रुग्णालय हे रुग्णांच्या उपचारासाठी तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने येथे तालुका भरातुन रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. मात्र गेल्या तिन महिन्यांपासून रुग्णालयात अँटीबायोटीक, आय.व्ही., डायक्लो आदि सारख्या आवश्यक औषधींचा तुटवडा भासत असून क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचारासाठी येत असल्याने अनेक समस्यांना वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांना तोंड द्यावे लागते. अशी माहिती रुग्णालायाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.विनय सोनवणे यांनी पत्रकारांना दिली. अशावेळी रुग्ण वा नातेवाईक मंडळीच्या रोषाला सामोरे जावे लागते. सध्याचे हवामान हे रोगट व साथीच्या रोगांना पसरविण्यास कारणीभुत असून आंतर रुग्ण विभागात पेशंट क्षमतेच्यावर होत असल्याने एका खाटेवर दोन अशी रुग्णाची व्यवस्था हॉस्पिटल व्यवस्थापणाला करावी लागत आसल्याची माहिती सोनवणे यांनी दिली. मागणी प्रमाणे लागणार्‍या औषधांची तुट भरून काढण्यासाठी पहूर ग्रामीण रुग्णालय यांच्याकडे मागणी केली आहे.