जामनेर : तालुक्यातील गोद्री येथे वयोवृद्धेचा गळा दाबून खून करीत दरोडेखोरोन वृद्धेच्या अंगावर अंगावरील सोन्याचे व चांदीचे दागिने लांबवल्याची घटना मंगळवा मध्यरात्री घडली होती. या प्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. बब्बू सांडू तडवी (27, रा. भारूडखेडा पहूर, ता.जामनेर)असे संशयीत आरोपीचे नाव आहे.
गळा दाबून खून करीत दागिने लांबवले
जामनेर तालुक्यातील गोद्री येथे मानबाबाई सरदार तडवी (85) या एकट्याच वास्तव्यास होत्या. त्यांच्या भागात त्यांचा मुलगा व सुन वेगळे राहतात. मंगळवार, 21 जून रोजी सायंकाळी जेवण करून मानबाबाई झोपल्या असताना मध्यरात्री संशयीत आरोपी बब्बू सांडू तडवी (27, रा. भारूडखेडा पहूर, ता.जामनेर) याने मध्यरात्री येवून वृध्द महिला झोपलेली असता तिचा गळा दाबून खून केला आणि अंगावरील सोन्याच्या बाळ्या, चांदीच्या पाटल्या मिळून 32 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी मयत मानबाबाई यांच्या सुन शेनफडाबाई बलदार तडवी यांनी पहूर पोलिस ठाण्यात संशयी आरोपी बब्बू सांडू तडवी याच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर दरोडा आणि खुनाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पहूरचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयीत आरोपी बब्बू सांडू तडवी याला अटक केली.