जामनेर। तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक कार्यकर्ते, संस्था आदी गरजूंना मदतीला धावून आले आहेत. अशातच मुख्यमंत्री सहायता निधीसाठीही अनेक मदतीचे हात सरसावत आहेत. त्याचाच एक खारीचा वाटा म्हणून जामनेर येथील आठवडे बाजारातील धन्वंतरी हॉस्पिटलचे डॉ.चंद्रशेखर पाटील यांनी तहसीलदार कार्यालय यांच्याकडे ११ हजार रूपयांचा मदतीचा धनादेश दिला. ही मदत गरजुपर्यंत लवकर पोहोचविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.