जामनेर : आपले सरकार वीज व पाण्याचे नियोजन करीत असल्यामूळे पूर्वीसारखे आता मोर्चे निघत नाही.वाघूर धरणातील पाणी जामनेर तालूक्यात वळवून शेतीसाठी 24 तास पाणी दिले जाईल. आपल्या तालूक्यातील जमीन सुपीक असून शेतकरी कष्टाळू आहे. शेतक-यांनी परंपरागत शेतीच्या मागे न लागता ड्रीप सिंचनच्या आधारावर आधूनिक व शाश्वत शेती करून जामनेर तालूक्याला नंदनवन करण्यासाठी हातभार लावावा, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षण मंत्री ना.गिरीष महाजन यांनी शनिवार 20 जानेवारी रोजी तालूक्यातील केकतनिंभोरा येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजने अंतर्गत प्रस्तावित 33/11 के.व्ही. उपकेंद्राचे भूमीपूजन प्रंसगी केले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती संगिता पिठोडे, भाजपा युवा मोर्चा तालूकाध्यक्ष अमर पाटील, जि.प.माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, सेवानिवृत्त उपअंभियता जे.के.चव्हाण, आत्माचे तालूकाध्यक्ष जितेंद्र पाटील, भाजपा वैद्यकिय आघाडीचे तालूकाध्यक्ष डॉ.प्रशांत भोंडे, मेडिसीन आसो.डिलर्सचे तालूकाध्यक्ष विकास पाटील, पं.स.माजी सभापती बाबुराव गवळी, आण्णा पिठोडे, प्रा.शरद पाटील, अभियंता एन.आर.चौधरी, एस.पी.राजपूत, एम.जी.महाजन, सरपंच सविता भोंडे, सदस्य हर्षदा पाटील, मिरा हिवरे, कल्पना ठाकरे, उषा जोहरे, रामदास शिंदे, अशोक शिंदे, ईश्वर भोंडे, ग्रामसेविका जयश्री महाजन, दिपक पाटील, निवृत्ती पाटील, माजी पो.पा.भागवत शिंदे यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधिकारी,कर्मचारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.