* चालकासह 3 प्रवासी जखमी,
* पावसामुळे झाला अपघात,
* केकतनिंभोरा गावाजवळील घटना
जामनेर – आगाराच्या नंदुरबारला जाणार्या एस.टी.बसला व मालवाहु टेम्पोला केकतनिंभोरा गावाजवळ अपघात घडल्याची घटना दुपारी 1 वाजे दरम्यान घडल्याचे समजते. याघटनेत बसनंतर रोडवरच्या झाडावर जावून धडकली.यात चालकासह आणखी 3 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. याबाबत अधीक माहिती अशी की जामनेर आगाराची बस क्रमांक 3992 हि साडेबारा वाजेला नंदुरबार जायला निघाली. त्यानंतर सुमारे 1 वाजे दरम्यान या बसमधे व मालवाहु टेम्पोत धडक होत.बस झाडाला जावून धडकल्याची घटना घडली.झाडाला धडकल्याने बसचा चालकाच्या बाजुचा काही पुर्णपणे चक्काचुर होवून तुटून बाजुला पडला बस चालक गुड्डू या सह आणखी तिन प्रवासी जखमी झाल्याचे माहिती घेतली असता कळाले.जोरात पाऊस चालू असल्याने समोरील रस्त्यावर अंधुक दिसत असल्याने हा अपघात झाल्याचे काही प्रत्यक्ष पाहणारांनी सांगितले. मात्र अपघात नेमका कशामुळे घडला हे नक्की समजले नाही.जखमींना लागलीच जळगाव येथे उपपचारासाठी रवाना करण्यात आले.