जामनेर नगरपरिषदेकडून स्वच्छ सर्वेक्षण मोहीम

0

जामनेर । जामनेर नगरपरिषतर्फे चालू वर्षात 1 नोव्हेंबर 2017 ते 31 डिसेंबर अखेरपर्यंत शहरात स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आले. शहरातील शाळा, महाविद्यालये, दवाखाने व हॉटेल यांच्या स्वच्छताबाबतीत बारकाईने पाहणी करून सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणात शाळा, महाविद्यालयांमधून इंदीराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालय, जामनेर पुरा, हॉस्पिटलमध्ये मिरा हॉस्पिटल तर हॉटेलांमधून स्री प्रसाद यांच्या व्यवस्थापनाकडून परिसर व आवारात अत्यंत साफ सफाई दिसून आली. त्यांना स्वच्छते बाबत क्रमांक 1 चे प्राधान्य देण्यात आले.

यशस्वितेसाठी यांनी पाहिले काम
नगरपरिषदेतर्फे सन 2018च्या स्वच्छ सर्वेक्षणसाठी स्वच्छता दुत म्हणून पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी शेख नुर मोहम्मद शफी मोहम्मद व रुपेश बाविस्कर(शिक्षक) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत नगरपरिषद मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, आरोग्य विभागाचे टेकचंद नेमाडे, रमेश हिरे आदिनीं काम पाहिले.