पहूर । चौदाशे कोटी खर्चाच्या महत्वाकांक्षी भागपूर योजनेतून तापी नदीचे पाणी जामनेरसह पाचोरा तालुक्यात लवकरच वळविणार असून भागपूर योजना जामनेर व पाचोरा तालुक्यातील जनतेची तहान भागविणार, अशी माहिती जलसंपदा तथा वैदयकिय शिक्षणमंत्री ना. गिरीष महाजन यांनी केले. मकर संक्रांतीच्या पर्वावर जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री महाजन यांच्या हस्ते दुय्यम निबंधक कार्यालयाचा शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते.
शासनदरबारी मागण्यांचा पाठपुरावा
पुढे ते म्हणाले की , जामनेर तालुक्यातील शाश्वत पाण्याची गरज लक्षात घेऊन येत्या आठवडाभरात नामदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते या योजनेच्या पहील्या टप्प्याचा शुभारंभ राज्यशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. भागपूर योजना जामनेर व पाचोरा तालुक्यातील जनतेची तहान भागविणार असून उपसा सिंचनाद्वारे दोघेही तालुके सुजलाम सुफलाम करण्यासाठी मी कटीबध्द असल्याचे ते म्हणाले.येत्या काळात अप्पर तहसिल कार्यालय , नगर परिषद आदी शासकिय सुविधा पहूर येथे पुर्णत्वास येण्याकामी नागरीकांच्या मागण्यांचा पाठपुरावा शासनाकडे केला जाईल, असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. प्रास्ताविक माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे यांनी केले. जिल्हा मुद्रांक अधिकारी आर .एल. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
एकनाथराव खडसेंचे मानले आभार
पहूर पेठ गावातील वाघूर नदीत गाळरोधक सिमेंट बांध व दोन रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचेही भूमीपूजन मंत्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले .तत्कालीन पाटबंधारे मंत्री एकनाथाराव खडसे यांच्या प्रयत्नांनी देवळी -गोगडी प्रकल्प पुर्णत्वास आल्यामुळे पहूर शिवार बहरले, त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत, असे गौरवोद्गार मंत्री महाजन यांनी काढले . मकर संक्रांतीच्या दिवशी मंत्री महाजन यांनी नाथाभाऊंबद्दल काढलेल्या भावोद्गाराने उपस्थितांना सुखद अनुभव दिला.
यांचा होता सहभाग
याप्रसंगी जिल्हा प्रशासकिय ए .एस. पाटील , सह दुय्यम निबंधक सुनिल पाटील , सोलापुर जिल्ह्यातील मोहोळचे दुय्यम निबंधक एफ .डी. निंबाळकर , पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केशवराव पातोंड , तहसिलदार नामदेव टिळेकर, सहायक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय असिस्टंट सुरेश सानप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, माजी शिक्षण समिती सदस्य समाधान पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, पहूरपेठचे सरपंच प्रदीप लोढा, कसबेच्या सरपंच ज्योतीताई घोंडगे, अॅड .एस.आर. पाटील ,ग्राम पंचायत सदस्य रामेश्वर पाटील, सलीम शेख, रोहयो तालुकाध्यक्ष समाधान पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण गोरे, श्यामराव सावळे, साहेबराव देशमुख आदी उपस्थिती होती . सुत्रसंचालन शिक्षक शंकर भामेरे यांनी केले. पहूरचे दुय्यम निबंधक अधिकारी सुनिल विसपुते यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी लिपीक स्वाती पाटील, माजी तंत्रज्ञ गौतम इंगळे, मुद्रांक विक्रेते संघाचे अध्यक्ष श्रीपाद विसपुते, शांताराम पाटील, विजय बनकर, कैलास पाटील ग्राम विकास अधिकारी एम.एफ.म्हस्के, सुनिल उभाळे, दिलीप पवार, प्रकाश घोंगडे आदींनी सहकार्य केले . तत्पूर्वी पहूर कसबे ग्रामपंचायत कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला.