जामनेर पोलिसांची गावठी हातभट्टीवर धाडी

0

हजारोच्या मुद्दे मालासह ८आरोपीवर गुन्हा दाखल


जामनेर।
राज्यासह जामनेर तालुक्यात लॉक डाऊन च्या परिस्थितीत अवैध दारू व गावठी हात भट्टीचा फार मोठ्या प्रमाणात ऊत आलेला होता. गावागावात, वाड्या वस्त्यांवर पाहिजे तेव्हा पाहिजे त्याठिकाणी ती उपलब्ध होत होती. सरकार मान्य देशी, विदेशी दारूची दुकाने बंद असल्याने या गावठी हात भट्टीला चांगली किंमत मिळत होती. त्यामुळे गावठी हातभट्टीवाले यांना चांगलेच फावले होते. परिणामी त्यांचा व्यवसाय तेजीत सुरु होता. मागील तीन दिवसाअगोदर कांग नदीपात्रात गावठी हात भट्टी विकणाऱ्याची धिंड जामनेर पोलिसांनी काढली होती. तरीही काही ठिकाणीही गावठी सुरूच होती. आज जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.व्ही.सुंदरडे, पोलीस उपनिरीक्षक युवराज अहिरे, पोलीस हेड कॉन्सेंटबल किशोर पाटील, संजय मोरे, रियाज शेख, विलास चव्हाण, विठ्ठल काकडे, पोलीस नाईक किशोर परदेशी, प्रकाश चिंचोरे, योगेश महाजन,पोलीस कॉन्स्टेबल सोनासिग ढोबाळ, प्रदिप पोळ, निलेश घुगे, तुषार पाटील, हंसराज वाघ, रामदास कुंभार, मुकेश आमोदकर, राहुल पाटील, संदीप सूर्यवंशी, अतुल पवार, जितेंद्र ठाकूर यांनी विशेष मोहिमेमध्ये भाग घेऊन वाघूर धरण बॅक वाटर क्षेत्रातील तसेच केकत निभोरा, भागदरा, जामनेर, इंदिरा आवास, तळेगाव शहापूर आदी ठिकाणच्या शरद श्रावण सुरडकर, राजू उखर्डू शिंदे, दादाराव रामदास जोगी, लालसिंग फुलसिंग गायकवाड, मोहन हिरामण गोपाळ, रमेश अर्जुन गायकवाड, दीपक ज्ञानदेव जाधव, दीपक नथू ठाकरे अश्या ८ आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांचेकडून ६६ हजार ४९८ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. हातभट्टी व देशी, विदेशी दारूवर अश्याच प्रकारे धडक कार्यवाही सुरूच राहील, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली.