Jamner police raid against illegal businesses : Excitement among illegal business operators जळगाव : अवैध धंदे करणार्यांच्या मनमानीला चाप लावत जामनेरचे निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वात पथकाने तब्बल चार लाख 28 हजार 50 रुपयांचे गावठी हातभट्टीची दारू व रसायन नष्ट करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अवैध धंद्यांविरोधात आतापर्यंत ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
कारवाईने उडाली खळबळ
जामनेर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे चाळीसगांव परीमंडळ, उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे पाचोरा भाग पाचोरा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे सोबत पोलीस उपनिरीक्षक दीपक मोहिते व पोलिस स्टॉफसह अवैध दारू धंद्यांवर कारवाई केली. चार लाख 28 हजार 50 रुपयांची गावठी हातभट्टीची दारू व रसायन नष्ट करण्यात आले. धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
यांच्यावर कारवाई
विकास रमेश खामकर (रा.बजरंगपुरा, जामनेर), रामकृष्ण सोनू भिल (रा.गारखेडा, ता.जामनेर), भरत दामु भिल (रा.गारखेडा, ता.जामनेर), दीपक नथ्थु ठाकरे (रा.गारखेडा, ता.जामनेर), रमेश सखाराम भिल (रा.हिंगणे बु, ता.जामनेर), आत्माराम तुळशीराम पवार (रा.गाडेगाव, ता.जामनेर), शिवलाल किसन गायकवाड (रा.करमाड, ता.जामनेर), बाबूलाल किसन गायकवाड (रा.करमाड, ता.जामनेर), रवींद्र रंगनाथ सुरवाडे (रा.शहापूर, ता.जामनेर), विमलबाई रामदास भिल (रा.शहापुर, ता.जामनेर), ईश्वर मकडू भिल (रा.खडकी, ता.जामनेर), ज्ञानेश्वर शांताराम राठोड (रा.कापुसवाडी, ता.जामनेरत्र, हरदास जगदेव बेलदार (रा.कापुसवाडी, ता.जामनेर), सोपान अशोक कोळी (रा.कापूसवाडी, ता.जामनेर), धनसिंग धिरसिंग राठोड (रा.कापूसवाडी, ता.जामनेर) आदींवर कारवाई करण्यात आली.