तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन ; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
रावेर – जामनेर येथील ‘दैनिक लोकमत’चे पत्रकार लियाकतअली सैय्यद यांच्यावर चुकीची बातमी छापल्याचा आरोप करून तेथील भाजप नगरसेवक पुत्र व त्याच्या सहकार्यांनी लाठ्या-काठ्या व लोखंडी रॉडच्या सहाह्याने भ्याड हल्ला केल्याप्रकरणी सोमवारी रावेर तालुक्यातील पत्रकारांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. रावेर तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करून संबंधित आरोपींविरुद्ध पत्रकार हक्क संरक्षण कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
ज्येष्ठ पत्रकार देवलाल पाटील (तरुण भारत), प्रदीप वैद्य (सकाळ), सतीश नाईक (सामना), कुमार नरवाडे (देशोन्नती), समशेर खान (दैनिक आव्हान)चंद्रकांत विचवे (देशदूत), शालिक महाजन (जनशक्ती), निलेश राजपूत (म टा), शकील शेख (स्वतंत्र भारत), प्रकाश पाटील (पुण्यनगरी), वासु नरवाडे (दिव्य मराठी), जयंत भागवत (दैनिकभास्कर), सुनील चौधरी (रावेर विकास), कृष्णा पाटील (कृषी सेवक), किरण चौधरी (लोकमत), तुषार मानकर,मोरेश्वर सुरवाडे, रवी महाजन, विजय पाटील, प्रवीण पाटील, संतोष नवले, शरीफ शेख, हमीद शेख, जाकीर खान, जमील शेख, रमेश पाटील, सरदार पिंजारी, योगेश सैतवाल, राजू खिरवडकर आदींनी काळ्या-फिती लावून तीव्र निषेध व्यक्त केला. व नायब तहसीलदार आर.पी.भावसार व पोलिस निरीक्षक आर.बी.वाकोडे यांना निवेदन देण्यात आले.
हल्ल्याचा मुक्ताईनगरातही निषेध
मुक्ताईनगर- लियाकत सय्यद यांना झालेल्या मारहाणीचा मुक्ताईनगर तालुका पत्रकारांतर्फे तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तहसीलदार श्याम वाडकर यांना दिलेल्या निवेदनातून आरोपींवर कठोर शासन करण्यात यावे व पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर मोतीलाल जोगी, विनायक वाडेकर, मतीन शेख, संदीप जोगी, अमोल वैद्य, स्वप्नील खोले, संतोष मराठे, राजेश चौधरी, प्रवीण भोई, रेहान खान, विकास चौधरी, राजेश पाटील, आरीफ आजाद, शरद बोदडे, दीपक चौधरी, एम.के.पाटील, सतीश चौधरी यांच्या सह्या आहेत.