जामनेर: जगभरात कोरोनाचे संकट असल्याने सार्वजनिक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंचा आणि सेवांचा पुरवठा सुरु आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन वस्तूंची चढ्या भावाने विक्री सुरु आहे. जामनेर शहरात किराणा मालाची चढ्या दराने विक्री सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील बहुतांश किराणा दुकानात मूळ किंमतीपेक्षा अधिक दराने किराणा मालाची विक्री सुरु आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असून कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. खाद्य तेलाची किंमत ८२ रुपया पर्यंत असताना त्याची विक्री ९८-१०० रुपये प्रती किलोप्रमाणे होत असल्याचे दिसून आले. जवळपास २० टक्के अधिक दराने विक्री असू असल्याचे दिसून आले आहे.
‘लॉक डाऊन’ व महाराष्ट्र राज्यात संचारबंदी आहे. एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गवाही दिली आहे की जनतेने कसलीच परवा न करता घरात रहावे जेणेकरून त्यांची सुरक्षा होईल व संसारोपयोगी तसेच अत्यावश्यक वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास कमी पडू देणार नाही व कसल्याच दुकानात गर्दी करून किंवा लाईन लाऊन सामान भरून भयभित होण्याची गरज नाही असे असताना जामनेर शहरातील व्यापारी या परिस्थितीचा फायदा घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.