जामनेर: शहरात काल झालेल्या अल्पसंख्याक समाजातील दोन गटाच्या वादाचे रूपांतर हाणामारीत होत ६ जन जखमी झाले होते. तसेच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जमाव बंदी आदेश लागू करण्यात आले।आहे. नागरिकांनी गर्दी करू नये, तसेच विनाकारणनागरिक रस्त्यावर फिरतांना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातून नुकतेच शहरातुन जामनेर पोलिस व जिल्हा राखीव पोलीस दलाकडून पथसंचालन करण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या नेतृत्वाखाली एपीआय राजेश काळे, डी. व्ही. सुंदरडे, यांच्यासह करण्यात आले.
शहरातील मुख्य रस्त्यांवरून जुना बोदवड रोड, मांडणी नगर , बशीर नगर, गणेश वाडी, गांधी चौक मार्गे नगर परिषद समोरील राजमाता जिजाऊ चौकात ।पथसंचलनाचा समारोप करण्यात आला. पथसंचलनाचा उद्देश म्हणजे नागरिकांनी घराबाहेर विनाकारण निघू नये पोलिसांचा वचक कायम रहावा असे असल्याचे सांगण्यात आले.