जामनेर येथे बंजारा समाज बांधवांचा मेळावा

0

जळगाव : जळगाव जिल्ह्यात बंजारा समाज हा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसर्‍या क्रमांकाचा समाज असून हा समाज अनेक वर्षापासून उपक्षीत आहे. समाज बांधवाला येणार्‍या विविध अडचणी, समस्या सोडविण्यासाठी सर्व बांधव एकत्र आले असून जामनेर येथे समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जामनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व बंजारा समाज बांधव मेळाव्यात सहभागी होणार आहे. मेळाव्यात समाजातील प्रश्‍न, मागण्या याविषयी सांगोपांग चर्चा करण्यात येणार आहे. समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.