जामनेर ।शेतकर्यांच्या भरड धान्य मालाला योग्य भाव देवून.ते शासनाकडून खरेदी करण्याच्या प्रक्रीयेला ना.गिरीश महाजन यांनी वजन काटा करून सुरूवात केली. यावेळी नायब तहसिलदार परमेश्वर कासूडे, जामनेर बाजार समीतीचे सभापती तुकाराम निकम, दिपक चव्हाण, पं.स.सभापती संगिता पिठोडे, अमर पाटील, सुभाष बोहरा, सुरेश पाटील, रमेश नाईक, बाबुराव गवळी आदी उपस्थित होते.
शेतकर्यांचे भरड धान्य थेट शासनच खरेदी करत असल्याने व्यापार्यांकडून होत असलेली आर्थिक लूट व अडवणुकीला आळा बसणार असून. शेतकरी बांधवाच्या हिताच्या या निर्णयाचे स्वागत करायला पाहिजे. ऑनलाईन खरेदी प्रक्रीयेमुळे शासन आणि शेतकरी बंधूचाही वेळ वाचण्यास मदतच होणार आहे. असे त्यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित शेतकरी बांधवाना सांगितले. तसेच आपले भरड धान्य माल शासकीय खरेदी केंद्रावर विक्रीस आणण्याचे आवाहन केले.