1 जानेवारी 2017 श्री. संत रोहिदास महाराज प्रतिष्ठानचा उपक्रम
शेंदुर्णी : संत रोहीदास यांनी कमकुवत व विभाजीत समाजाला संघटीत करतांना मानवतेच्या मार्गात ज्या रुढी व परंपरांमुळे अडचणी निर्माण होत होत्या त्यांच्याविरूद्ध साहसाने तत्कालीन जातीय व्यवस्थेविरुद्ध लढून मानवतेच्या समर्थनार्थ त्यांच्या रचनामधुन समाज घडविण्याचे कार्य केले. त्यामागची त्यांची विचारधारा व उदिष्टे डोळ्यासमोर ठेऊन येथील श्री.संत रोहीदास महाराज प्रतिष्ठानच्या वतीने डिसेंबर 2014 मध्ये नोंदणी करुन अशोक भारुडे, दिपक तायडे, रामचंद्र वानखेडे, संजय उंबरकर, विकास कळसकर, नारायण सुरळकर, एम. के.कडोबा बाविस्कर, साहेबराव पद्मे यांनी समाज बांधवांच्या एकत्री करणासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले असून त्या व्दारे गुणवंत विदयार्थी सत्कार व वधुवर परीचय मेळावा असे कार्यक्रम घेतले जातात.
स्पर्धापरीक्षा अभ्यासिका उभारणार
प्रतिष्ठान मार्फत 1 जानेवारी 2017 रोजी जामनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारात दुसरे राज्यस्तरीय वधु-वर मेळाव्याचे आयोजन जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. विवाह जुळणीसाठी समाज मंडळाचे वतीने प्रयत्न करण्यात येईल तसेच समाज भुषण डॉ.अरविंद बोंडेकर यांनी समाज मंगल कार्यालय व समाजाचे विदयार्थी आणि विदयार्थीनीसाठी जामनेर येथे स्पर्धापरीक्षा अभ्यासिका उभारण्यासाठी 5 हजार चौरस मिटरची भुखंड दान दिला असुन तेथे मंगल कार्यालय, परीक्षार्थीसाठी निवास व ग्रथालय, संगणक कक्ष याप्रमाणे व्यवस्था करण्यात येणार असून त्यासाठी समाजातील दात्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष व विश्वस्त मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.