जामनेर । महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधीमंडळ पक्ष नेते अजित पवार यांच्या वाढदिवसा निम्मीत राष्ट्रवादी काँग्रेस जामनेर व जिल्ह्याचे माजी युवक सरचिटणीस अभिषेक पाटील यांच्याकडून महिला जिल्हाध्यक्षा कल्पनाताई पाटील व युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील व शहरातील चालक बंधूंचा एक लाख रुपयांचा मोफत अपघात विमा काढून देण्यात आला. यावेळी 350 चालकांनी विम्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची पुर्तता करून नाव नोंदणी केली व विमा काढला असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला चालकांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्ह्याचे सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, महिला जिल्हा उपाध्यक्षा मीनाक्षी चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष जावेद मुल्लाजी, अरुण उघडे, पप्पू पाटील, किशोर खोडपे, निलेश बोदडे, प्रभू झाल्टे, प्रशांत सुरवाडे, सुनील बाविस्कर, राजू चौधरी, मीनाताई शिंदे, मोहन चौधरी, नगरसेवक माधव चव्हाण, माजी नगरसेवक अनिल बोहरा, विशाल पाटील, पराग नेरकर, दत्ता नेरकर, सागर पाटील, नरेंद्र जंजाळ, पिंटू चौधरी, विशाल पाटील, प्रभाकर पाटील, कृष्णा माळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.