भुसावळ । शहरातील जयश्री को.ऑप सोसायटीत कर्जदाराच्या जामीनदाराने दिलेल्या धनादेश न वटल्याने संस्थेने खटला दाखल केला होता. या खटल्यात जामीनदार डिगंबर दोधू सोनगिरे (कंडारी) यांना न्या.पी.ए.पाटील यांनी एक वर्ष कैद व नुकसान भरपाईपोटी एक लाख 75 हजार रुपये देण्याची शिक्षा सुनावली. जयश्री को.ऑप सोसायटीतून निर्मला पुना पाटील यांनी कर्ज घेतले.
त्यांना सोनगिरे हे जामीनदार राहिले. कर्जदारांच्या कर्जापोटी सोनगिरे यांनी धनादेश दिला मात्र तो बँकेत न वटल्याने खटला दाखल करण्यात आला. जामीनदार सोनगिरे यांना एक वर्ष कैद व एक लाख 75 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले तसेच भरपाई न दिल्यास चार महिने कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. संस्थेतर्फे गिरीश पाटील यांनी फिर्याद दिल्यानंतर खटला दाखल करण्यात आला होता तर संस्थेतर्फे अॅड.प्रफुल्ल पाटील यांनी काम पाहिले.