भुसावळ : नागरीकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे मारहाण करणार्या पोलिस प्रशासनासह भाजपा सरकारचा भुसावळ शहर काँग्रेस कमेटीतर्फे निषेध करण्यात आला. या संदर्भात मंगहवारी प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. देशात युवकांना रोजगार उपलब्ध होत नसताना दुसरीकडे शेतकरी आर्थिक विवचंनेत असून देशानेही आर्थिक पातळीवर निचांक गाठला असताना एनआरसी व कॅब आदी कायदे करून भारतीय संविधानाला गालबोट लावण्याचे काम मोदी सरकार करीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
निवेदनावर भुसावळ शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष रवींद्र निकम, जनआधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास पगारे, विवेक नरवाडे, रहिम मुसा कुरेशी, विलास खरात, मुन्ना सोनवणे, इम्रान खान आदींसह पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.