नवी दिल्लीः सीएए कायदा लागू केल्यानंतर दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ चर्चेत आहे. जामिया प्रकरणावरून संपूर्ण देशात राजकारण तापले होते. दरम्यान आता जामिया विद्यापीठात अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात विद्यार्थी जखमी झाला आहे. नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान एका माथेफिरू युवकाने गोळीबार केला, अशी माहिती मिळाली आहे.