जामुन झिर्‍याला ध्यानकेंद्राचे स्वरुप

0

वरणगाव। यावल तालुक्यातील जामुन झिरा गावाजवळील सातपूडा पर्वत रांगेतील बुध्दाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अरण्यात अनेक वर्षापासून भन्ते महानाम हे ध्यानसाधना करीत असल्याचे त्यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगीतले. जामुन झिरा हे गाव यावल तालुक्यातील दहिगाव पासून 3 कि.मी. अतंरावर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आहे. या लहान खेड्यात व परिसरातील डोंगराळ भागात आदिवाशी लोकांची वस्त्या आहेत.

अंजनाच्या वृक्षाखाली अनेक वर्षांपासून ध्यानसाधना
मोहराळा, दहिगाव, सौखेडा हरिपूरा, कोरपावली, विरावली येथे बौध्द समाज बांधवामध्ये बुध्दाचे आचार विचार अंगीकार करण्याकरीता अरण्य भन्ते महानाम यांनी सातपुडा पर्वतात एका उंच टेकडीवर डेरेदार अंजनाच्या वृक्षाखाली एकांतवासात अनेक वर्षापासून ध्यान साधनेसाठी बसून असल्याचे भंन्ते यांनी केलेल्या अनुकरणानुसार अडिच हजार वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुध्द व त्यांचा भिख्कुसंघ या पर्वत रांगेतून मध्य प्रदेशातील उजैन लेणी निर्मितीनंतर धम्माचा प्रचार व प्रसार करत जामुनझीरा अरण्यमार्गे मुंबईकडे नाशिक पांडव लेणी, नालासोपारा लेणी या लेण्याची निर्मिती करत पुढे गेले आहे. त्याच दृष्टीकोणातून अरण्य भन्ते महानाम यांनी बुध्दाच्या प्रती पदस्पर्शाने झालेल्या सातपुडयातील अरण्यात मोठे बुध्द विहार बांधण्याचा माणस अंगी बाळला आहे. त्यांच्या हातून सतकर्माचे काम व्हावे. आणि येथील आदिवाशी व शहरातील खेड्यापाड्यातील वाडी वस्त्यामध्ये भरकटलेला बौद्ध समाजाच्या बांधवांमध्ये धम्माचा प्रसार करीत आहे. भन्ते महानाम यांना लहानपणापासूनच सामाजीक कार्याची आवड होती. त्यांचे नाव सुरेश असून ते अकोला येथील रहिवाशी आहे. त्यांनी 1997 मध्ये आगर्‍यातील काशिपूर येथे उपसंपादक या कार्यक्रमात भन्ते आंनद महास्थविर यांच्या हस्ते बौद्ध धम्माचे आचार विचार अंगीकृत करून संसार व आई वडील परिवाराचा त्याग करून धर्माचा प्रसार करण्याकरीता चिवर प्रधान केले आहे. 40 वर्षापासून समाजातील शेवटच्या घटकातील मानवाला सतमार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करित आहे. तसेच बौद्ध बांधवामध्ये त्यानी धम्मप्रसाराचे ज्योत पेटून ठेवलेल्या बांधवांचे या ठिकाणी भन्ते यांच्या सानिध्यात आहे. नुकतेच जामुन झिरा या गावात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बुध्द विहाराकरीता जागा मिळवून जागेचे भूमिपूजन भुसावळ तालुक्याचे भन्ते सुमनतीस्स व भन्ते सुमनात्रिपुरा मध्यप्रदेश यांच्या हस्ते करण्यात आले. तर भन्ते अरण्य महानाम यांना विपश्यना व साधना करण्याकरीता पहाडातील डोंगराळ अरण्यात हिस्त्र वन्य प्राणी पाण्याच्या शोधात येत असल्याने धम्मकुटीकरीता वनविभागाकडे जागेची मागणी करणार असल्याचे सांगितले.