पिंपरी-चिंचवड : जालना जिल्ह्यातील भाजप पदाधिकार्यांनी आरपीआयमध्ये प्रवेश केला. विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनीही यावेळी आरपीआयमध्ये प्रवेश केला. सर्वांनी खासदार अमर साबळे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला. याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) उद्योग सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम, पुणे जिल्हाध्यक्ष विजय साळवे, जालना जिल्हाध्यक्ष आकाश पाजगे, प्रवक्ते अमित भालेराव, ब्रह्मेश ब्रह्मराक्षे, हेमराज चौधरी, गोपाळ रोकडे, धरमवीर शर्मा, नागेश रेवाले, नागेश अवचार, बबलू यादव, राहुल अवचार, संदीप कुयड उपस्थित होते.
यांनी केला प्रवेश
बदनापूर तालुक्यातील बाजारवायगावचे उपसरपंच सुरेश अडसूळ, दीपक अडसूळ, संगीत अडसूळ, देवपिंपळगावचे उपसरपंच श्याम आठवले, सखुबाई घोरपडे, लीलाबाई वाहूक, निधोना गावाचे सरपंच दीपक आदमाने, शंकर हिवराळे, बापूराव आदमाने, गणेश आदमाने, झाल्टा गावाच्या छबाबाई नाडे, मेधाबाई पडूळ यांनी आरपीआयमध्ये प्रवेश केला. दलित चळवळीतील कार्यकर्त्यांचे दहशतवादी, नक्षलवादी यांच्याशी संबंध असल्याचे बेताल वक्तव्य करणार्या खासदार अमर साबळे यांच्यासारख्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा यावेळी अमित मेश्राम यांनी दिला.