जालना येथिल घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समजाच्या वतीने भडगांव नायब तहसीलदारांना निषेध निवेदन.

भडगाव ( प्रतिनिधी )—

जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलीसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ सकल मराठा समाजा सह विविध संघटनाच्या पदाधिकार्यांच्या वतीने नायब तहसीलदार राजेंद्र आहिरे व पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनातील आशय असा आहे की, जालना येथे मराठा आंदोलकांवर विनाकारण अमानुषपणे लाठीचार्ज करुन समस्त राज्यातील मराठा समाजाच्या भावना दुखवण्याचे काम या पोलीस विभागाद्वारे करण्यात आले असून तरी त्या संदर्भात पोलीस विभागाकडून कुठल्याही प्रकराचा माफीनामा किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. यावेळी भडगाव तालुका सकल मराठा समाज व विविध संघटनेच्या वतीने या घटनेचा निवेदनाद्वारे जाहीर निषेध व्यक्त करीत या घटनेतील पोलिसांना तात्काळ बडतर्फ करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. व संबंधीत आरोपींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदनावर डॉ.बी.बी. भोसले,प्रशांत पवार, हर्षल पाटील,योजना पाटील, रेखा पाटील, विजय कुमार भोसले,प्रदिप पाटील,प्रदिप देसले,लखीचंद पाटील, परशुराम पाटिल (पेंटर),इम्रान अली सैय्यद, रमेश भदाणे, अनिल वाघ, निलेश मालपुरे, निलेश पाटील, मंगेश पाटील, विजय पाटील, तुषार देशमुख, संजय पाटील, विवेक पवार, अविनाश देशमुख, चेतन पाटिल, प्रमोद पाटील मंगेश पाटिल, गुलाब पाटिल, योगेंद्र पाटिल, निखिल पाटील, हर्षल सोनवणे,यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांन सह विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या व उपस्थिती होती.

 

फोटो — भडगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, नायब तहसिलदार राजेंद्र आहिरे यांना निवेदन देतांना पदाधिकारी, नागरीक.