जावईबापूला सासरच्यांकडून मार

0

गांधीनगर । गुजरात गांधीनगरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्या बहिणीला गेल्या अनेक वर्षांपासून मारहाण करणार्‍या, तसेच मानसिक त्रास देणार्‍या जावईबापूला पीडित महिलेच्या माहेरच्या कुटुंबीयांनी कायदा हातात घेत त्याच्यावर लाठ्याकाठ्यानिशी हल्ला चढवत भररस्त्यात चोप दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांच्या पसंतीला पडत आहे. पण कायदा हातात घेतल्यामुळे यावर टिका देखील होत आहे. इतकेच नव्हे तर आपल्या मुलीवर अत्याचार करूनही समाजात ताठ मानेने मिरवणार्‍या या जावईबापूच्या कारचीही तोडफोड करत चांगलीच अद्दल घडवली. दरम्यान, सोशल मीडियावर पोस्ट केलेला जावईबापूंची धुलाई होत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि ही घटना हा-हा म्हणता वार्‍यासारखी पसरली. आपला नवरा आपल्याला गेल्या पाच वर्षांपासून मारहाण करत असल्याचे पीडित महिलेचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी आपल्याला नवर्‍याने अमानुषपणे केलेल्या मारहाणीत आपल्या डोळ्याला दुखापत झाल्याचेही या महिलेने सांगितले. या मारहाणीत जवळ जवळ आपला डोळा निकामीच झाल्याचेही ती म्हणाली. आपले चोचले पूर्ण करण्यासाठी आपला पती आपल्याकडे सतत पैशांची मागणी करत असे.