जावयाची आत्महत्या, सासू अटकेत

0
भुसावळ : व्यवसायाने आचारी असलेल्या व मेथाजी मळा भागातील रहिवासी अरविंद पुंडलिक महाजन (35, लक्ष्मीनगर) यांनी 13 नोव्हेंबर  गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत सासू कमू पाटील या सातत्याने पैसे मागतात व त्रास देतात म्हणून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले होते.
या प्रकरणी सासू कमू आत्माराम पाटील (62, रा.सागरवाडी, लालबाग, बर्‍हाणपूर) यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपास शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सारीका खैरनार करीत आहेत.