जावयाने केला सासऱ्यावर हल्ला

0

ठाणे – एक धक्कादायक घटना डोंबिवली पूर्वेकडील इंदिरानगर परिसरात घडली आहे. लाकडी खाटेवरुन बाजूला सरकण्यास सांगणाऱ्या सासऱ्याच्या पोटावर जावयाने काचेच्या तुकड्याने वार केले.

मिळालेल्या माहितीनुसार, अतुल फणसे असे हल्लेखोर जावयाचे नाव आहे, तर नागेश पाथरे (४२) असे जखमी सासऱ्याचे नाव आहे. त्यांचा जावई काही कामानिमित्त सासुरवाडीला होता. दुपारच्या सुमारास सासरे नागेश यांनी जावई अतुलला लाकडी खाटेवरुन बाजूला सरकण्यास सांगितले तर, संतापलेल्या जावयाने घराबाहेर जावून सासूला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पाथरे यांनी माझ्या पत्नीला शिव्या का देतोस, असा जावयाला विचारले. यानंतर जावई अतुलने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तेथील काचेच्या तुकड्याने सासऱ्याच्या पोटावर वार केले.

जखमी झालेल्या सासऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात त्यांनी जावयाविरोधात तक्रार नोंदवली.