जावयाला मारहाण प्रकरणी सासर्‍याविरुद्ध गुन्हा

0

धुळे- मर्जीविरुद्ध जावून मुलीने विवाह केल्याने संतप्त पित्याने जावयालाच मारहाण केल्याप्रकरणी सासर्‍यासह दोघांविरुद्ध देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अहमदाबाद येथील जयेश नंदकिशोर पवार (23, नरवा रोड, अहमदाबाद, गुजराथ) यांनी धुळ्यातील जयहिंद कॉलनीतील संजय भिकनराव देवरे यांच्या मुलीशी विवाह केल्याचा राग आल्याने देवरे यांच्यासह दिनेश वाघ (बुधगाव) यांनी 1 रोजी जयेश पवार यांना जयहिंद कॉलनी परीसरात मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली.