जाहिरातीचा बोर्ड लावताना पालिका विद्युत खांब कोसळला

0

खोपोली । शहरातील पालिकेच्या व विद्युत मंडळाच्या विद्युत खांब जाहिराती लावण्यात येत आहेत. परंतु, जाहिरात लावण्याच्या नादात सदर विद्युत खांब गंजला आहे का? याची पाहाणी न करता बिनधास्तपणे वर चढून जाहिरात लावण्यात येत आहेत यावेळी आपल्या जिवाची परवा केली जात नसल्याची घटना लक्ष्मी नगर येथील अरिहंत रेसिडेंसीसमोर एक जाहिरात विभागाचा तरूण जाहिराताचा बोर्ड लावण्यासाठी विद्युतखांबावर चढला असता खाली खांब गंजलेला असल्याने सदर खांब या युवकाच्या वजनाने खाली कोसळला. मात्र, यादरम्यान युवकाला दुखापत झाली नसली तरी यावेळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

खोपोली शहरात छोट्या जाहिराती बोर्ड विद्युत खांबावर लाण्यात सर्रास लावले जात आहे. मात्र, पालिकेचे व विद्युत मंडाळाचे विद्युत खांब गंजलेले आहेत यावरून विद्युत पुरवठा केला जात असला तरी ते गंजलेल्या अवस्थेत आहेत.तर शहरातील मुख्य रस्त्याच्या बाजूलाच हे खांब असल्याने जाहिरातबाजीसाठी सोयीस्कर असल्याने जाहिरात एजन्सी किंवा अनधिकृतपणे जाहिराती लावण्यात येत आहे. परंतु या जाहिराती लावताना विद्युत खांब गंजला आहे का? याची पहाणी न करता बिनधास्तपणे वर खांबावर चढून जाहिरात लावण्यात येत आहेत. यावेळी आपल्या जिवाची परवा केली जात नसल्याची घटना लक्ष्मी नगर येथील अरिहंत रेसिडेंसी समोर एक जाहिरात विभागाचा तरूण जाहिराताचा बोर्ड लावण्यासाठी विद्युतखांबावर चढला असता खाली खांब गंजलेला असल्याने सदर खांब या युवकाच्या वजनाने खाली कोसळला. मात्र, यादरम्यान युवकाला दुखापत झाली नाही.