जाहिराती करणे हे सरकारचे दुर्दैव – खा. सुप्रिया सुळे

0

अमळनेर- जाहीरात ही फक्त शाम्पू आणि साबणाची केली जाते परंतु सध्याचे सरकार स्वत:चीच जास्त जाहीरात करत आहे. या फसव्या जाहिराती सातत्याने कराव्या लागतात हेच सरकारचे दुर्देव आहे असा अशी टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी अमळनेरच्या जाहीर सभेत केली. हल्लाबोल आंदोलनाच्या पाचव्या दिवसातील तेरावी सभा अमळनेर येथे मोठया प्रतिसादात पार पडली. धुळे जिल्हयातून जळगाव हद्दीमध्ये कोंढावळ फाट्यावर प्रवेश करताच भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी तरुणांचा उत्साह बघता तरुणाची बुलेट चालवत सहभाग नोंदवला. दरम्यान, अमळनेर मतदार संघातून अनिल भाईदास पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत देण्यात आले असून यास खासदार सुप्रिया सुळे यांनीही पुष्टी दिली आहे.