जाहिरात फलकासाठी निविदा प्रक्रिया राबवा

0

-डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुपची मागणी
पिंपरी : महापालिका हद्दीत जाहिरातीचे अनेक फलक आहेत. यामध्ये अनधिकृत फलकांची संख्या अधिक आहे. पालिकेने पंधरा वर्षांपूर्वी पालिका हद्दीत जाहिरात फलक लावण्याबाबत एका ठेकेदार संस्थेस परवानगी दिली होती. परवानगी देताना कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नाही. ही परवानगी रद्द करुन जाहिरात फलकांसाठी नवीन निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी, अशी मागणी डॉ. बी.आर.आंबेडकर ग्रुप या संस्थेने महापालिकेकडे केली आहे.

पालिकेची आर्थिक फसवणूक
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना संस्थेचे अध्यक्ष सतिश कदम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एका स्पर्धा न होता केवळ एका विशिष्ट ठेकेदारास नाममात्र शुल्क आकारुन परवानगी देण्यात आली आहे. यातून पालिकेचा मोठा महसूल बुडून पालिकेची आर्थिक फसवणूक होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार संस्था/कंपनीस देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात यावी आणि जाहिरात फलकांसाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी.