जाहीरनामा पुस्तीकेवरील चित्रच दाखवते भाजपसाठी देश महत्त्वाचा नाही : कॉंग्रेस

0

नवी दिल्ली:भाजपने आज लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपने संकल्पपत्र असे जाहीरनाम्याला नाव दिले आहे. एकूण ७५ संकल्पांचा यात समावेश आहे. दरम्यान कॉंग्रेसने भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. जाहीरनामा पुस्तिकेवर केवळ मोदींचाच छायाचित्र आहे. यावरून दिसून येते की भाजपला देश महत्त्वाचा नसून फक्त मोदी महत्त्वाचा आहे असे आरोप कॉंग्रेसने केले आहे. ट्वीटरवरून कॉंग्रेसने भाजपच्या जाहिरनाम्यावर टीका केली आहे.

भाजप आणि कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात हेच साम्य आहे. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात कोट्यावधी जनतेचा विचार केला गेला आहे म्हणूनच काँगेसने जनतेला जाहीरनामा पुस्तिकेवर स्थान दिले आहे, तर भाजपने फक्त मोदींचाच फोटो जाहीरनामा पुस्तिकेवर छापले आहे. यावरून जनता आता ठरवेल असेही कॉंग्रेसने म्हटले आहे.